मैदानी स्पर्धेत भुसावळातील कोलते स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

Success of students of Kolte School in Bhusawal in field competition भुसावळ (8 ऑक्टोबर 2024) : कोलते फाउंडेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन संचलित द वर्ल्ड स्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. मंगळवार, 7 रोजी झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत कोलते फाउंडेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन संचलित द वर्ल्ड स्कूलमधील 14 वयोगटातील सातवीची विद्यार्थिनी आर्या काळेने सहाशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विड करण्यात आली.
यशस्वी विद्यार्थ्यांना वेळोवेळी क्रीडा शिक्षक सुमित दास गुप्ता आणि शाळेच्या क्रीडा शिक्षिका अश्विनी पाल यांनी मागर्दर्शन केले. शाळेचे संचालक सी.ए.रोहित कोलते, शाळेच्या मुख्यध्यापिका पेट्रिश्या ह्यसेट यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
