जळगावातील बोगस कॉल सेंटर प्रकरण : ललित कोल्हे नाशिक कारागृहात


Bogus call center case in Jalgaon : Lalit Kolhe in Nashik jail जळगाव (9 ऑक्टोबर 2025) : जळगावात पोलिसांनी उद्ध्वस्त केलेल्या एल.के.फार्म हाऊसवरील बोगस कॉल सेंटर प्रकरणात अटकेतील माजी महापौर ललित कोल्हे यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची रवानगी नाशिक कारागृहात करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी आता आर्थिक व्यवहार जाणून घेण्यासाठी बँकांना पत्र दिले आहे तर या प्रकरणातील पसार संशयीतांचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

या संशयीतांचा आता पोलिसांकडून कसून शोध
या गुन्ह्यातील अभिमन्यू सिंग, योगेश हिसारिया, मुदतरसिंग, मिनास, आकाश, फैजल, ओंकार, वरुण अय्यर अशा 8 साथीदारांची अपूर्ण नावे निष्पन्न झाली असून त्यांचा संपूर्ण पत्ता मिळवून त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. संशयितांना नोकरीसाठी कोणी आणि कशा प्रकारे प्रलोभन दिले तसेच त्यांच्यासोबत नोकरीस असलेले इतर लोक कोण होते, या दिशेनेही तपास सुरू आहे.

पोलिसांनी याप्रकरणाच्या सखोल तपासासाठी बुधवारी संशयितांची कोठडी मागितली होती. यात नागरिकांना फसवण्यासाठी वापरलेल्या स्क्रिप्ट्स कोणी तयार केल्या, याचा तपास करण्यासह संशयितांनी फसवणूक करून मिळवलेली मोठी रक्कम त्यांनी कशी प्राप्त केली, कुठे ठेवली तसेच बनावट बँक खात्यांचा वापर केला आहे का आदी कारणांचा समावेश होता.

प्रमुख सूत्रधारासह तिघांचा कसून शोध
बोगस कॉल सेंटरचा प्रमुख सूत्रधार अकबर खान, त्याचा हँडलर आदिल सम्पद निसार, तांत्रिक तत्ज्ञ राजू बेरिया हे अजूनही पसार आहेत. संशयीतांच्या शोधार्थ पोलिसांचे पथक मुंबईत गेले मात्र दोन दिवसांपूर्वी हे पथक सुध्दा रिकाम्या हाती परतले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !