गुन्हेगारांना मोठे करणार्या गृहराज्यमंत्री कदम यांनी राजीनामा द्यावा : अंजली दमानिया

Minister of State for Home Affairs Kadam, who is glorifying criminals, should resign : Anjali Damania मुंबई (9 ऑक्टोबर 2025) : गँगस्टर नीलेश घायवळ याच्या भावाला शस्त्र परवाना देऊन अडचणीत सापडलेल्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गुरूवारी केली आहे. गुन्हेगारांना मोठे करणारे व डान्सबार असणारे मंत्री महाराष्ट्राने का सहन करावेत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
मंत्र्यांनी शस्त्र परवाना दिल्याचा आरोप
राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गँगस्टर गुंड नीलेश घायवळचा भाऊ सचिन बन्सीलाल घायवळ याला शस्त्र परवाना दिल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. योगेश कदम यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला शस्त्र परवाना देणे हे कायदा व सुव्यवस्थेला धक्का देणारे आहे. त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून गुन्हेगाराला बळ दिल्याने त्यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
सार्वजनिक सुरक्षेची ऐशीतैशी करणारे तुम्ही कोण?
अंजली दमानिया या प्रकरणी म्हणाल्या की, गृहराज्य मंत्री योगेश कदम. मी एक सामान्य नागरीक म्हणून तुमच्या राजीनाम्याची मागणी करते. गुन्हेगारांना मोठे करणारे आणि डान्सबार असणारे मंत्री महाराष्ट्राने का सहन करावेत? पोलिस आयुक्तांचा अहवाल/शिफारस अत्यंत महत्त्वाची असते जर परवाना या टप्प्यावर नाकारला गेला असेल तर त्यामागे साधारणपणे गुन्हेगारी पार्श्वभूमी असते.
पण आपण पोलिसांच्या नकारानंतर परवाना कसा आणि का मंजूर केला? एका गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला तुम्ही का दिलात? पोलिसांचा निर्णय तुम्ही का बदलला? याचे उत्तर तुम्हाला द्यावेच लागेल. कारण हा कायद्याचा अपमान आहे. सार्वजनिक सुरक्षेची ऐशीतैशी करणारे तुम्ही कोण? असा खडा सवाल दमानिया यांनी यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.
