सीजेआय यांच्यावर हल्ला : आरोपी वकिलाचे बार असोसिएशन सदस्यत्व रद्द


Attack on CJI: Accused lawyer’s Bar Association membership cancelled नवी दिल्ली (9 ऑक्टोबर 2025) :  सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनने (एससीबीए) गुरुवारी संशयीत वकील राकेश किशोर (71) यांचे सदस्यत्व तत्काळ प्रभावाने रद्द केले आहे. राकेश किशोर यांनी भारताचे सरन्यायाधीश (सीजेआय) बी.आर. गवई यांच्यावर बुट फेकून हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

बंगळुरूमध्ये गुन्हा दाखल
बंगळुरूमधील ऑल इंडिया अ‍ॅडव्होकेट्स असोसिएशनने राकेश किशोर यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. बंगळुरू पोलिसांनी भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या कलम 132 आणि 133 अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे. सरन्यायाधीश गवई यांनी वकिलाविरुद्ध तक्रार दाखल करण्यास नकार दिला आहे.

6 ऑक्टोबर रोजी राकेश यांनी सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. बूट सरन्यायाधीशांपर्यंत पोहोचू शकला नाही. त्यावेळी सरन्यायाधीशांच्या खंडपीठात एका खटल्याची सुनावणी सुरू होती. सुरक्षा कर्मचार्‍यांनी वकिलाला ताब्यात घेतले आणि बाहेर काढले. घटनेदरम्यान त्यांनी भारत सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही अशा घोषणा दिल्या होत्या. दरम्यान, पोलिसांनी सांगितले की सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार्‍यांनी या प्रकरणात कोणतीही तक्रार दाखल केली नसल्याने त्यांच्याशी बोलल्यानंतर वकिलाला सोडून देण्यात आले.

हे तर आचारसंहितेचे उल्लंघन
सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने त्याच दिवशी आरोपी वकिलाचा परवाना रद्द केला. त्यांची नोंदणी 2011 पासूनची आहे. बार कौन्सिल ऑफ इंडिया नेही त्यांना तत्काळ निलंबित केले. बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मनन कुमार मिश्रा यांनी म्हटले आहे की, हे वकिलांच्या आचारसंहितेचे उल्लंघन करते. निलंबनाच्या काळात किशोर कुठेही प्रॅक्टिस करू शकणार नाहीत. 15 दिवसांच्या आत कारणे दाखवा नोटीस देखील जारी केली जाईल.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !