धुळ्यातील कुख्यात गुन्हेगार प्रेम शिरसाठ नाशिक कारागृहात स्थानबद्ध


Notorious criminal Prem Shirsath from Dhule lodged in Nashik jail धुळे (9 ऑक्टोबर 2025) : सामाजिक शांततेला अडसर ठरू पाहणार्‍या उपद्रवींविरोधात धुळे जिल्हा पोलिस प्रशासनाने धडक मोहिम सुरू केली आहे. त्या अंतर्गत अनेकांवर आतापर्यंत हद्दपार तसेच मोक्का व स्थानबद्धतेची कारवाई केली जात आहे. पोलिसांच्या अभिलेखावरील कुख्यात गुन्हेगार प्रेम शिरसाठ यालादेखील गुन्हेगारी पार्श्वभूमीमुळे नाशिक कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

संशयीताविरोधात आठ गंभीर गुन्हे
संशयीत प्रेम जितेंद्र शिरसाठ (25, मिलिंद सोसायटी, नवी पुलाजवळ, साक्री रोड, धुळे) विरोधात गेल्या आठ वर्षात खुनाचा प्रयत्न, महिलांचा विनयभंग, छेडखानी, अश्लील कृती, धार्मिक भावना दुखावणे, जबरी चोरी, गृह अतिक्रमण, दंगा करणे, शांतता भंग करणे, जीवे ठार मारण्याची धमकी, घातक हत्यारांनी दुखापत करणे, चिथावणी देणे आदी प्रकारचे 11 गुन्हे शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये दाखल आहेत.

संशयीताची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता त्याला स्थानबद्ध करण्यासाठी धुळे शहर पोलिसांनी पोलिस उपअधीक्षक राजकुमार उपासे यांच्याकडे प्रस्ताव पाठवल्यानंतर त्याची गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांनी छाननी केली व पोलिस अधीक्षकांच्या मार्फत हा प्रस्ताव जिल्हाधिकाश्री भाग्यश्री विसपुते यांच्याकडे पाठवण्यात आल्यानंतर त्यास एक वर्ष स्थानबद्ध करण्यास मंजुरी मिळाली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक राजकुमार उपासे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार, धुळे शहर पोलिस निरीक्षक दीपक पाटील, पोलिस उपनिरीक्षक राजेश इंदवे, पोलिस अंमलदार संतोष हिरे, कबीर शेख, सतीष कोठावदे, हर्षल चौधरी व गौरव देवरे यांनी केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !