जळगाव गुन्हे शाखेची मोठी कारवाई : वरणगावातील संशयीत दोन गावठी कट्टे व जिवंत काडतूसांसह जाळ्यात


Major operation by Jalgaon Crime Branch : Two suspects from Varangaon caught with knives and live cartridges भुसावळ (9 ऑक्टोबर 2025) : पोलिसांच्या रेकॉर्डवरील शस्त्र तस्करी प्रकरणात संशयीताला वरणगावात पुन्हा दोन पिस्टल व एक जिवंत काडतूसांसह जळगाव गुन्हे शाखेने पकडल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे. संजय गोपाळ चंडाले (50, दर्यापूर शिवार, ऑर्डनन्स फॅक्टरी, वरणगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
वरणगाव शहरातील रेकॉर्डवरील आरोपी संजय गोपाळ चंडाले हा विना परवाना शस्त्र बाळगून फिरत असल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथकाने बुधवार, 8 रोजी धावत घेतली. वरणगाव शहरातील तिरंगा चौकात संशयीतला रात्री 11.30 वाजेच्या सुमारास ताब्यात घेण्यात आले. आरोपीच्या अंग झडतीत त्याच्याकडील दोन गावठी कट्टे व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक डॉ,महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोललि निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शरद
बागल, ग्रेडेड पोलिस उपनिरीक्षक रवी नरवाडे, हवालदार गोपाळ गव्हाळे, हवालदार उमाकांत पाटील, नाईक विकास सातदिवे, नाईक श्रीकृष्ण देशमुख, कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, कॉन्स्टेबल राहुल वानखेडेख चालक भारत पाटील आदींच्या पथकाने केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !