यावल महाविद्यालयात मराठी अभिजात भाषा दिनानिमित्त वकृत्व स्पर्धा

यावल (9 ऑक्टोबर 2025) : यावल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मराठी अभिजात भाषा दिनानिमित्त वकृत्व स्पर्धा घेण्यात आली. यात महाविद्यालयातील 12 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मोठ्या उत्साहात सदर स्पर्धा झाली. यात दिक्षा पंडीत हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाजाचे यावल येथे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने मराठी अभिजात भाषा दिनानिमित्त माझी मायबोली मराठी या विषयावर वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या स्पर्धेचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रा. एम. डी.खैरनार होते तर प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य डॉ. हेमंत भंगाळे उपस्थित होते.
मराठीची पुर्वपिठीका ते अभिजात मराठी भाषा असा दिर्घ प्रवास विद्यार्थ्यांनी आपल्या संभाषणातून उलगडून दाखवला.मराठी भाषेतील साहित्य, साहित्यिक, मराठी मायबोलीचा महिमा आणि मराठी भाषेचे समाजातील योगदान या विषयावर देखील विद्यार्थ्यांनी प्रकाश टाकला.एकूण 12 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.दिक्षा राजू पंडीत, पिंटी बिरसिंग तडवी तर तनिषा किरण साळवे या विद्यार्थीनींनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा.रत्नाकर कोळी यांनी केले. सूत्रसंचालन मराठी विभागाचे प्रा.रामेश्वर निंबाळकर यांनी तर आभार प्रा.हेमंत पाटील यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा. प्रशांत मोरे यांनी परिश्रम घेतले.
तांत्रिक बाबी उर्दु विभागाचे प्रा इम्रान खान व भुगोल विभागाचे प्रा पंकज महाजन यांनी सांभाळल्या.या प्रसंगी मराठी विभागाचे तसेच इतर विभाचे देखील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
