केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या पेट्रोल पंपावर दरोडा : एक लाख 18 हजारांची रोकड लूटली


Robbery at Union Minister Raksha Khadse’s petrol pump: Cash worth Rs 1 lakh 18 thousand looted मुक्ताईनगर (10 ऑक्टोबर 2025) : क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मालकीच्या पेट्रोल पंपावर पिस्टलधारी दरोडेखोरांनी दरोडा टाकल्याची घटना गुरुवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास घडल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरोडेखोरांनी या घटनेत तब्बल एक लाख 18 हजारांची रोकड लूटली असून मोबाईलही लांबवले आहे. दरम्यान, शिरपूर तालुक्यातही नुकताच अशाच पद्धत्तीने दरोडा घालण्यात आल्याने संशयीत एकच असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

अशी झाली लूट
मुक्ताईनगरातील ‘रक्षा ऑटो फ्युएल्स’ या केंद्रीय मंत्री खडसे यांच्या पेट्रोल पंपावर गुरुवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास दोन दुचाकीवरून आलेल्या पाच दरोडेखोरांनी हिंदी व मराठी भाषेत संवाद साधून दोन कर्मचार्‍यांना गावठी कट्टा दाखवत एक लाख 18 हजारांची रोकड व मोबाईल हिसकावत पळ काढला.

रेकॉर्डवरील आरोपी असल्याचा संशय
यावेळी पेट्रोल पंपावरील प्रकाश माळी व दीपक खोसे या दोन कर्मचार्‍यांना मारहाण करण्यात आली तसेच पंपावरील कार्यालयातील संगणक (कम्प्युटर), प्रिंटर, सीसीटीव्ही आणि विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तोडफोड करण्यात आली. आरोपी रेकॉर्डवरील संशयीत असल्याचा अंदाज आहे.

पोलिसांची धाव मात्र चोरटे पसार
मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी तोडफोड व रोकड घेऊन बोहर्डीच्या दिशेने पळ काढल्याची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिस निरीक्षक आशिष कुमार अडसूळ यांनी तत्काळ त्या दिशेने पोलीस पथके रवाना केली मात्र चोरटे गवसले नाहीत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !