पालकांनो, हॉस्टेलमध्ये तुमची मुले सुरक्षित आहेत का ? तळसंदेत विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण


Parents, are your children safe in the hostel ? Students brutally beaten in Talsande हातकणंगले (11 ऑक्टोबर 2025) : दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादाच्या कारणातून तळसंदे, ता.हातकणंगले, जि.कोल्हापूर येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांना दोन ते तीन विद्यार्थ्यांनी अत्यंत अमानुषपणे मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. या प्रकारानंतर हॉस्टेलमध्ये राहणारे विद्यार्थी खरोखर सुरक्षित आहेत का? असा प्रश्न आता विचारला जावू लागला आहे. अत्यंत अमानुष मारहाण होत असताना संस्था चालक व रेक्टर काय करीत होते ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अमानुष मारहाणीचा व्हिडिओ समोर
तळसंदेमधील एका निवासी हॉस्टेलमध्ये काही विद्यार्थी लहान विद्यार्थ्यांना अमानुष पद्धतीने मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. हातात बॅट आणि दांडके घेऊन अनेक लहान विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली आहे.

हे व्हिडिओ व्हायरल होत असतानाच याच हॉस्टेलमध्ये दोन दिवसांपूर्वी झालेल्या मारहाणीत सिद्धीविनायक सनी मोहिते (16, रा.उचगाव, ता.करवीर, जि.कोल्हापूर) जखमी झाला. पहाटे पाचच्या सुमारास हॉस्टेलमध्ये हा प्रकार घडला. पेठ वडगाव पोलिसात हॉस्टेलच्या रेक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमी सिद्धीविनायकला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले व मारहाणीची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे. मात्र, या प्रकरणानंतर पालक वर्गातून विद्यार्थ्यांना मारहाण होत असल्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. हॉस्टेल प्रशासन अथवा पोलिसांकडून या संदर्भात अधिकृतरित्या कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान, सीपीआर चौकीत दाखल झालेल्या फिर्यादीनुसार फिर्यादीचा मुलगा संबंधित शाळेमध्ये दहावीच्या वर्गामध्ये शिक्षण घेत आहे. तो त्याच ठिकाणी हॉस्टेलमध्ये राहत आहे. 6 ऑक्टोबर रोजी फिर्यादीचा मुलगा आणि वर्गातील विद्यार्थी पृथ्वीराज कुंभार यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. त्या भांडणात आरोपीने दोन्ही मुलांना ताकिद दिली होती. याच भांडणाच्या कारणावरून पीटी परेडवेळी आरोपीने जखमी विद्यार्थ्यास स्टेजवर नेऊन मारहाण केली होती.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !