डिजिटल अ‍ॅरेस्ट प्रकरणी तरुणाला अखेर बेड्या


Youth finally arrested in digital arrest case मुंबई (11 ऑक्टोबर 2025) : मुंबईच्या मध्य प्रादेशिक सायबर पोलिसांनी सांगलीच्या तरुणाला शुक्रवारी अटक केली. विकास चव्हाण (28) असे आरोपीचे नाव आहे. डिजिटल अ‍ॅरेस्ट प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. ही फसवणूक 14 ते 16 एप्रिल दरम्यान घडली होती.

असे आहे फसवणूक प्रकरण
तक्रारदाराला अनोळखी क्रमांकावरून कॉल आला होता. कॉल करणार्‍याने दिल्ली पोलिस मुख्यालयातून बोलत असल्याचे सांगून फिर्यादीच्या बँक खात्यात बेकायदेशीर व्यवहार झाल्याची भीती दाखवली. त्यानंतर अधिकारी भूपेश कुमार आणि गोपेश कुमार असल्याचे भासवत व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क केला.

त्यांनी सीबीआय लेटर हेडवरील बनावट अटक आदेश आणि अन्य कागदपत्रे दाखवून फिर्यादीचे नाव नवाब मलिक आणि हसीना पारकर यांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाशी जोडल्याचे सांगितले त्यामुळे घाबरलेल्या तक्रारदाराकडून फंड व्हेरिफिकेशनच्या बहाण्याने विविध बँक खात्यांमध्ये 15 लाख रुपये जमा करून घेतले.

राजस्थानमध्येही गुन्हा
तपासात ही रक्कम फेडरल बँकेतील एका खात्यात जमा झाल्याचे उघडकीस आले. त्यापैकी पाच लाख रुपये तत्काळ अन्य खात्यात वळते झाले. पुढे ती रक्कम धनादेशाद्वारे काढण्यात आली. हे खाते सांगलीतल्या खानापूर तालुक्यातील तांदळगावचा रहिवासी असलेल्या विकास याचे असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्यावर मुंबई व राजस्थान येथेही गुन्हे दाखल असून तपास सुरू आहे. त्याला 13 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !