भरधाव ट्रकने उडवले : चोपडा तालुक्यातील दुचाकीस्वार ठार

A speeding truck hit a bike rider in Chopra taluka and killed him चोपडा (12 ऑक्टोबर 2025) : भरधाव ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला तर दुचाकीवरामगील तरुण जखमी झाला. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. चोपडा-सनपुले रस्त्यावर शुक्रवार. 10 रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात घडला. रोहिदास जुलाल पाटील (वय 46, रा. सनपुले) असे मयत इसमाचे नाव आहे.
असा घडला अपघात ?
रोहिदास हा मित्रासह दोघेही सकाळी पिण्याच्या पाण्याचे कुप्पे घेऊन दुचाकी क्रमांक (एम.एच.20 डी.ओ.7564) वरून कुरवेलकडे जात होते. त्या दरम्यान चोपड्याकडून भरधाव वेगाने येणार्या ट्रक (क्र. आरजे 11 जीए 9211) या धडकेत मोटारसायकल चालक रोहिदास पाटील हे ट्रकच्या मागच्या चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर हंसराज मोहन पाटील (25, रा.सनपुले) जखमी झाला.
मयत रोहिदासच्या पश्चात पत्नी, 2 मुली व एक मुलगा आहे. अपघातानंतर ट्रकचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. या घटनेची माहिती मिळताच गावातील अनिल साहेबराव पाटील, आप्पा सुरेश पाटील, विवेक ज्ञानेश्वर पाटील, ललित मोहन पाटील, भूषण भास्कर पाटील आदी ग्रामस्थ घटनास्थळी धावले. त्यांनी जखमी हंसराज पाटील यांना तसेच मयत रोहिदास पाटील यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.हंसराज पाटील यांनी रुग्णालयात दिलेल्या जबाबानुसार चोपडा ग्रामीण पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
