यावल नगरपालिकेत प्रारूप मतदार यादींवर हरकतींचा पाऊस


Rain of objections on draft voter lists in Yaval Municipality यावल (12 ऑक्टोबर 2025) : यावल नगरपालिकेमध्ये सार्वत्रिक निवडणुकरीता प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. अनेकांनी या मतदारांची पडताळणी करून अनेक तक्रारी नगरपालिकेत दाखल केल्या आहेत. शनिवारी सायंकाळपर्यंत मोठ्या संख्येत नागरिकांनी या ठिकाणी लेखी स्वरूपात हरकती दाखल केल्या. यात प्रभाग क्रमांक 3 व 5 या दोन प्रभागातील अधिक तक्रारी आहेत.

मतदारयादीत प्रचंड तफावत
नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता यावल नगरपालिका कार्यालयामध्ये प्रारूप प्रभाग निहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर या मतदार यादीवर शनिवारी मोठ्या संख्येत नागरिकांनी हरकती घेतल्या आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 5 व प्रभाग क्रमांक 5 यांच्या मतदार यादीत खूपच तफावत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या संदर्भातील तक्रारी तथा हरकतीचे लेखी पत्र कार्यालयात कार्यालय अधीक्षक विशाल काळे यांच्याकडे देण्यात आले आहे.

दरम्यान, या हरकती आबीद खान, वसीम खान, छाया कदम, साबीर शेख, हुसेन तडवी, मोहसीन खान, अरमान शाह, आरिफ खान अय्युब खानसह आदींच्या वतीने घेण्यात आल्या आहेत. लेखी स्वरूपातील हरकती प्राप्त करून घेण्यात आल्या असून त्यावर आता प्रशासकीय पातळीवर निपटारा केला जाईल, असे काळे यांनी सांगितले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !