यावल तहसीलमध्ये उद्या निघणार पंचायती समिती गणाचे आरक्षण !

Reservation of Panchayat Samiti posts will be held tomorrow in Yaval Tehsil! यावल (12 ऑक्टोबर 2025) : यावल तहसील कार्यालयात सोमवार, 13 ऑक्टोंबर रोजी पंचायत समितीच्या गणांचे आरक्षण काढले जाणार आहे. दुपारी तीन वाजता विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत निघेल. सभापती पद हे सर्वसाधारण असल्याने पंचायत समितीच्या गणातील आरक्षणाकडे संपुर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
आरक्षणाकडे लागले लक्ष
यावल तहसील कार्यालयात सोमवार, 13 ऑक्टोंबर रोजी दुपारी 3 वाजेला पंचायत समितीच्या गणांचे आरक्षण निघणार आहे. या साठीची सभा प्रांताधिकारी बबन काकडे यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे. पंचायत समितीच्या एकूण दहा गणात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी) असे आरक्षण निघेल.
या आरक्षणानंतर एकूण 10 पैकी पाच जागेवर महिलांसाठीचे देखील आरक्षण निघेल तर पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण असल्याने या आरक्षण सोडतीकडे राजकिय वर्तळाचे लक्ष लागुन आहे
