चाळीसगाव शहर पोलिसांची कामगिरी पिस्टलासह संशयीत जाळ्यात

Chalisgaon City Police’s performance in catching a suspect with a pistol चाळीसगाव (13 ऑक्टोबर 2025) : पिस्टलाच्या धाकावर दहशत निर्माण करणार्या संशयीताला चाळीसगाव शहर पोलिसांनी रविवारी पहाटे अटक केली. मयुर राजु मोरे (19, रा.प्रभात गल्ली, चाळीसगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव असून त्याच्याकडून गावठी कट्टे व दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
संशयीतांविरोधात गुन्हा
पोलिस शिपाई रविंद्र निंबा बच्छे यांच्या फिर्यादीनुसार. शनिवार, 11 ऑक्टोबर रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ, उपनिरीक्षक गणेश सायकर तसेच पोलीस कर्मचारी निलेश पाटील, ज्ञानेश्वर पाटोळ, नरेंद्र चौधरी, कल्पेश पगारे, केतन सुर्यवंशी, राकेश महाजन आणि पंचांच्या उपस्थितीत कोबींग ऑपरेशन सुरू असताना रविवारी पहाटे अडीखच वाजता एक तरुण छाजेड ऑईल मिलच्या पाठीमागे, घाटरोड ते हुडको त्रिमूर्ती बेकरी मार्गावर गावठी कट्टा घेऊन येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर संशयीताला ताब्यात घेण्यात आले.
आरोपी मयुर राजु मोरे (19, रा. प्रभात गल्ली, चाळीसगाव) ची अंगझडती घेतल्यावर त्याच्या कमरेच्या उजव्या बाजूस लपवलेले गावठी बनावटीचे 30 हजार रुपयांचे पिस्तुल आणि खिशात दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
तपास पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश सायकर करीत आहेत.
