गुंड निलेश घायवळचा पासपोर्ट अखेर रद्द : प्रादेशिक कार्यालयातून ऑर्डर जारी


Goon Nilesh Ghaywal’s passport finally cancelled: Order issued from regional office पुणे (23 ऑक्टोबर 2025) : पुण्यातील कोथरूडमधील गोळीबारानंतर कुख्यात गुंड निलेश घायवळच्या अडचणी वाढल्या आहेत. गुंड निलेश घायवळ सध्या स्वित्झर्लंडला असून त्याने घायवळ ऐवजी गायवळ नावाचा वापर करत पासपोर्ट मिळवण्याचे यापूर्वीच पोलिस तपासात समोर आल्यानंतर आता त्याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे. पासपोर्ट प्रदेश कार्यालयातून याबाबतची ऑर्डर जारी झाली आहे.

अडचणीत झाली वाढ
पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी न्यायालयात तसेच पासपोर्ट प्रादेशिक कार्यालयात घायवळ बाबत अहवाल सादर केला होता. पासपोर्ट रद्द झाल्याने निलेश घायवळच्या अडचणी वाढल्या आहेत. गुन्ह्याच्या संदर्भातील प्रतिज्ञापत्र आणि नावाच्या बाबत खोटी कागदपत्रे सादर करून गुंड नीलेश घायवळ याने अहिल्यानगर येथून पासपोर्ट मिळवला होता. त्याप्रकरणी पुणे पोलिसांनी अहिल्यानगर पोलिस दलाली एका पोलिस निरीक्षकासह दोघांना नोटीस बजावली होती.





पडताळणीत दिला स्वच्छ अहवाल
निलेश घायवळ याने 2019 मध्ये अहिल्यानगर पोलिसांकडून पासपोर्ट काढला आहे. तेथील राहता पत्ता आणि इतर कागदपत्रे देऊन त्याने हा पासपोर्ट काढला. त्यावेळी कागदपत्रांची व राहत्या पत्त्याची पडताळणी स्थानिक पोलिसांकडून करण्यात आली मात्र त्याच्याविरोधात अनेक गंभीर गुन्हे नोंद असतानाही पासपोर्ट पडताळणी अहवाल स्वच्छ दाखवण्यात आला असा संशय व्यक्त झाला. कदाचित त्याच्या आडनावातील हेराफेरीमुळे गुन्हे प्रणालीतून त्याचे नाव सुटले असावे असा कयास आहे. मात्र, दुसरीकडे ‘डीएसबी’मध्ये कार्यरत असलेल्या पोलिसांना तो माहिती नसावाख, असे देखील नाही असा संशय आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !