भुसावळ बाजारपेठ पोलिसांची मोठी कारवाई : दोन पिस्टल व काडतूसांसह दुकली जाळ्यात
गोपनीय माहितीवरून कारवाई
शहरातील कुणाल ठाकूर या संशयीताकडे गावठी पिस्टल असल्याची माहिती डीबी पथकाला मिळाल्यानंतर संशयीताला रंगोली हॉटेल परिसरातून कट्टा व दोन काडतुसांसह ताब्यात घेण्यात आले. चौकशीत कुणालने कट्टा वरणगावच्या उदयकडून घेतल्याची व तो वरणगावात लपवून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर उदयला कट्टा व एका जिवंत काडतुसासह अटक करण्यात आली.




यांनी केली कारवाई
ही कारवाई भुसावळचे पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत, बाजारपेठ पोलिस राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव, हवालदार विजय गेरकर, हवालदार कांतीलाल केदारे, हवालदार राजेश सुकदेव काळे, कॉन्स्टेबल जावेद शहा, कॉन्स्टेबल पंकज प्रकाश तावडे, चालक एएसआय सुनील सोनवणे, चालक हसमत अली यशीर अली सय्यद, कॉन्स्टेबल सचिन चौधरी, कॉन्स्टेबल हर्षल महाजन, कॉन्स्टेबल जीवन कापडे, कॉन्स्टेबल महेंद्र पाटील, कॉन्स्टेबल भूषण चौधरी, कॉन्स्टेबल अमर अडाडे, कॉन्स्टेबल प्रशांत सोनार, कॉन्स्टेबल योगेश माळी, कॉन्स्टेबल योगेश महाजन आदींच्या पथकाने तसेच वरणगावचे हवालदार यासीन पिंजारी, कॉन्स्टेबल प्रशांत ठाकुर आदींनी केली.