जळगाव शहर पोलिसांची कारवाई : गावठी पिस्टल बाळगणारा संशयीत जाळ्यात


Jalgaon City Police action: Suspect in possession of village pistol caught जळगाव (24 ऑक्टोबर 2025) : जळगाव शहर पोलिसांनी दहशतीसाठी पिस्टल व काडतून बाळगणार्‍या संशयीताला अटक केली आहे. हर्षल जितेंद्र कदम (28, रा.मकरा टॉवर, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीच्या ताब्यातून 15 हजार रुपये किंमतीचा कट्टा व पाचशे रुपये किंमतीचे काडतूस जप्त करण्यात आले.

गोपनीय माहितीवरून कारवाई
जळगाव शहर पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांना बुधवारी बिग बाजारकडे जाणार्‍या रस्त्यावर दोस्ती बिअर शॉपसमोर एक संशयित इसम विनापरवाना पिस्तूल बाळगून असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले.





गुन्हे शोध पथकाने संशयीत हर्षल जितेंद्र कदम (28, रा.मकरा टॉवर, जळगाव) यास ताब्यात घेतल्यानंतर पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीदरम्यान त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस आढळल्याने ते जप्त करण्यात आले.

पोलिस कॉन्स्टेबल अमोल अशोक ठाकूर यांच्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास दीपक सुरवळकर करीत आहेत.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, जळगाव शहर पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील पाटील, उमेश भांडारकर, सतीश पाटील, नंदलाल पाटील, योगेश पाटील, विरेंद्र शिंदे, दीपक शिरसाठ, भगवान पाटील, अमोल ठाकुर, भगवान मोरे, राहुलकुमार पांचाळ आणि प्रणय पवार यांच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !