किनोदच्या तरुणाची गळफास घेत आत्महत्या
Kinod youth commits suicide by hanging जळगाव (29 ऑक्टोबर 2025) : जळगाव तालुक्यातील किनोद गावातील तरुणाने गळफास घेतला. ही घटना सोमवार, 27 रोजी दुपारी 2 ते 3 वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. लोटन पंडित बाविस्कर (40, रा.किनोद, ता.जळगाव) असे मयताचे नाव आहे.
मिस्त्रीकाम करून उदरनिर्वाह करणार्या लोटन बाविस्कर यांनी सोमवारी दुपारी घरी कोणी नसताना त्यांनी छताला गळफास लावला. त्यांच्या एका मित्राने फोन लावला मात्र लोटन यांनी फोन न उचलल्याने त्यांनी लोटन यांच्या पत्नीला कळविले. तेव्हा लोटन यांच्या पत्नी घरी गेल्यावर हा प्रकार समोर आला.




लोटन बाविस्कर यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. यावेळी जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तरुणाने आत्महत्या का केली? याचे कारण अस्पष्ट आहे.