भुसावळात भावाच्या खुनाची खोटी माहिती देणार्या विक्रेत्याविरोधात गुन्हा
असे आहे नेमके प्रकरण
संशयीत बाळू कापसे (गांधी नगर, भुसावळ) हा मठ्ठा विक्रीची काम करून नातेवाईकांसोबत वास्तव्याला आहे. 28 रोजी रात्री 12.30 वाजता संशयीत बाळूने 112 क्रमांकावर फोन लावत आपल्या भावाचा खून झाला असल्याचे सांगत तातडीने यावे म्हणून निरोप दिला. कंट्रोल रूमवरून तातडीने हा मेसेज बाजारपेठ पोलिसांना गेल्यानंतर कॉन्स्टेबल हर्षल महाजन व कॉन्स्टेबल मनोज भागवत गालफाडे हे कमन सर्व्हिस सेंटर, गांधी नगर भागात दाखल झाले मात्र त्याचवेळी संबंधिताने फोन बंद केल्यानंतर पोलिसांनी संशयीताचे घर शोधले असता खुनाचा प्रकार ही निव्वळ अफवा ठरल्यानंतर दुसर्या दिवशी संशयीत बाळू कापसेविरोधात भारतीय न्याय संहिता 2023 कलम 212 व 217 अन्वये कॉन्स्टेबल गालफाडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.




तातडीच्या मदतीसाठी संपर्क क्रमांक : राहुल वाघ
पोलिस ठाण्याचा क्रमांक लागत नसल्यास तातडीचा क्रमांक 112 वर मदत मागता येते मात्र विनाकारण पोलिसांना कुणी मानसिक त्रास देत असल्यास अशा अपप्रवृत्तींविरोधात निश्चितपणे कठोर कारवाई होईल, असा इशारा पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिला.