लिव्ह ईनमध्ये राहणार्या महिलेची विहिरीत ढकलून हत्या : बर्हाणपूरच्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा
Burhanpur accused sentenced to life imprisonment for murdering woman living in live-in home by pushing her into a well भुसावळ (29 ऑक्टोंबर 2025) : लिव्ह ईन रिलेशनशीपमध्ये राहणार्या महिलेने आपल्यासोबत लग्न करावेत म्हणून तगादा लावल्यानंतर संशयीतांने महिलेला फिरण्याच्या बहाण्याने बाहेर नेत तिला विहिरीत ढकलले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बर्हाणपूरच्या आरोपीला भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
असे आहे प्रकरण
मुक्ताईनगर तालुक्यातील भावेपिंप्री शिवारात सुमारे तीन वर्षांपूर्वी महिलेला तिचा प्रियकर गुलाम इद्रीस गुलाम हुसेन (45, रा.मोमीनपुरा, वार्ड क्र. 30, श्रीकुमार बिल्डिंगजवळ, बर्हाणपूर) याने विहिरीत ढकलले होते. मयत महिलेसोबत आरोपीचे अनैतिक संबंध होते. दोघे लिव्हईन रिलेशनशिपमध्ये राहत होते मात्र मयत महिला वारंवार लग्नाचा आग्रह धरत असल्याने आरोपीने 27 मार्च 2022 रोजी आरोपीने महिलेला सैलानी येथे नेले व नंतर मुक्ताईनगर शिवारातील नायगाव रोडवरील रवींद्र भास्कर पोहेकर यांच्या शेतातील विहिरीवर नेले. दोघे सकाळपासून दुपारपर्यंत बसले होते. त्यानंतर आरोपीने महिलेवर रागाच्या भरात विहिरीत ढकलले. महिला विहिरीतील पंपाच्या वायर व पाईपला धरून बाहेर येण्याचा प्रयत्न करत असताना आरोपीने विळ्याने वायर व पाईप कापून महिलेला विहीरीतील पाण्यात बुडवून जीवे ठार मारले. या घटनेप्रकरणी मयत महिलेचा भाऊ शे.फरीद शे. मुसा (रा. बडनेर भोलजी, ता.नांदुरा, जि.बुलढाणा) यांनी मुक्ताईनगर पोलिसात तक्रार दिल्यानंतर 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.




प्रत्यक्षदर्शीची साक्ष ठरली महत्त्वाची
या खटल्याची सुनावणी भुसावळ यसत्र न्या.एस.बो.हेडाऊ यांच्या न्यायासनासमोर झाली. सरकार पक्षातर्फे या खटल्यात एकूण 17 साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये फिर्यादी शे. फरीद शे. मुसा, मयताची बहिण हसीनाबी शेख, पंच साक्षीदार अब्दुल रफीक अब्दुल मजील, वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली ए. पाटील, तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार सुरज मराठे यांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. खटल्यात परिस्थितीजन्य पुरावे, आरोपी-मयत महिला यांच्या मोबाईल लोकेशन तपासणी अहवालांसह नोडल अधिकार्यांची साक्ष निर्णायक ठरली. तपासात तत्कालीन निरीक्षक नागेश मोहिते, तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रदीप कारभारी शेवाळे, तसेच तपास पथकातील अधिकार्यांचे योगदान उल्लेखनीय ठरले.
जन्मठेप व पाच हजार रुपये दंड
सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता मोहन देशपांडे यांनी प्रभावी युक्तिवाद मांडला. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून पोलीस शिपाई कारखा यांनी सहकार्य केले. न्यायालयाने सर्व पुराव्यांचा विचार करून आरोपी गुलाम इद्रीस गुलाम हुसेन यास दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.