बँक व्यवहारात ब्लॅक मनीची भीती दाखवत ज्येष्ठ महिलेला सव्वा कोटींचा गंडा
Elderly woman duped of Rs 1.25 crores, citing fear of black money in bank transactions पुणे (29 ऑक्टोंबर 2025) : काळ्या पैशांच्या व्यवहारात बँक खात्याचा वापर झाल्याची भीती दाखवत सायबर भामट्याने ज्येष्ठ महिलेला तब्बल एक कोटी 19 लाखांचा गंडा घातला. शिवाजीनगर सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे नेमके प्रकरण ?
तक्रारदार महिलेच्या मोबाईलवर 16 ऑगस्ट रोजी चोरट्यांनी संपर्क साधला. त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे पोलिसांसारखा गणवेश परिधान करून महिलेशी संवाद साधला. चोरट्यांनी महिलेला सांगितले की, तिच्या बँक खात्याचा वापर काळ्या पैशांच्या व्यवहारासाठी झाला आहे आणि सीबीआय या प्रकरणाची चौकशी करत आहे.




चोरट्यांनी महिलेला आणि तिच्या पतीला अटक होण्याची शक्यता असल्याचे सांगून भीती दाखवली. अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करावे लागतील, असे सांगून त्यांनी महिलेला त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले.
या भीतीपोटी महिलेने चोरट्यांच्या खात्यात वेळोवेळी एक कोटी 19 लाख रुपये जमा केले. पैसे मिळाल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले. महिलेने याबाबत चौकशी केली असता, आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.