दिल्ली बॉम्ब स्फोटानंतर पोलिसांच्या नाकाबंदीत आढळली एक कोटींची रोकड
One crore rupees in cash found at police checkpoint after Delhi bomb blast रोहतक (12 नोव्हेंबर 2025) : राजधानी दिल्लीत बॉम्बस्फोट घडल्यानंतर त्यात नऊ जणांचा मृत्यू ओढवला होता. या स्फोटानंतर देशभरात सुरक्षा व्यवस्था सतर्क झाल्या असून सर्वत्र नाकाबंदी सुरू असतानाच हरियाणातून एक मोठी बातमी समोर आली आहे.
हरयाणामध्ये पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान एक कार जप्त केली असून या कारमध्ये एक कोटी रुपयांची रोकड आढळल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे. रोहतक येथील शिवानी कॉलनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना असून पोलिस निरीक्षक राकेश सिन्हा यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
झज्जर येथून आलेल्या एका कारची नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी तपासणी केली असता त्यात एक करोड रुपयांची रोकड आढळून आली. या कारमध्ये चार जण प्रवास करत होते.
पोलिसांनी संबंधित घटनेची माहिती तात्काळ आयकर विभागाला दिली असून पुढील तपास सुरू आहे. सध्या रोहतक ट्रेजरीमध्ये ही रोकड जमा करण्यात आली आहे.


