15 तासात 100 कि.मी.अल्ट्रा मॅरेथॉन : भुसावळातील डॉ.तुषार पाटील व विजय फिरके यांचा रणवीर पराक्रम
100 km ultra marathon in 15 hours : The incredible feat of Dr. Tushar Patil and Vijay Phirke from Bhusawal भुसावळ (12 नोव्हेंबर 2025) : बावधन रनिंग ग्रुप द्वारा खडकवासला अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा 9 रोजी झाली. ज्यात 25 किमी 35 किमी, 55 किमी, 75 किमी आणि 100 किमी अशी अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा पुण्यातील खडकवासला येथे झाली. मॅरेथॉनमध्ये भुसावळचे डॉ.तुषार पाटील या स्पर्धेत ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून सहभागी झाले. त्यांच्यासोबत भुसावळचे विजय फिरके सहभागी झाले.
15 तासात मॅरेथॉन पूर्ण
ताप्ती रनिंग ग्रुपच्या ह्या दोघांनी 100 कि.मी.ची अल्ट्रा रन मॅरेथॉन फक्त पंधरा तासात त्यांनी पूर्ण केली. मॅरेथॉनचा सकाळी दोन वाजता फ्लाग ऑफ झाला. सकाळी सकाळी गारठा थंडीतून वळणाच्या वाटेतून रनिंग करताना डोंगराळ भाग पानशेत आणि खडकवासला येथील नयनरम्य निसर्गातून मॅरेथॉन पटू आपली क्षमतेने धावत होते. धावताना त्यांना थंडी वारा ऊन रात्र दिवस या निसर्गाच्या सर्व बाबींशी झुंज करावी लागली.
स्पर्धेत शंभर किलोमीटरचा कट ऑफ हा सोळा तासाचा होता परंतु या दोघांनी तो फक्त पंधरा तासातच पूर्ण केला. डॉ.तुषार पाटील व विजय फिरके हे दोघेही आंतरराष्ट्रीय जागतिक नावलौकिक असणारा अल्ट्रा कॉम्रेड रनर पूर्ण करणारे जिल्ह्यातील नामवंत मॅरेथॉनपटू आहेत. ताप्ती रनिंग ग्रुपचे भुसावळ येथील एलआयसी शाखेचे मॅनेजर दीपक पाटील यांनी 25 किमी व जितू पाटील यांनी 55 किमी या मॅरेथॉनमध्ये सहभाग घेऊन पूर्ण केले.
भुसावळ येथील ताप्ती रनिंग ग्रुप द्वारा चारही धावपटूंचा यथोचित प्रमोद शुक्ला, अॅड.देशपांडे, तरुण बिरीया, झोपे काका अशा मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला. प्रसंगी डॉ. तुषार पाटील यांनी तेथील त्यांचे चित्त थरारक अनुभव मांडले. सूत्रसंचालन डॉ.संजू भटकर तर रणजीत खरारे यांनी मानले. अजय आंबेकर, संजय भदाणे, शरद पाटील, संतोष मोटवानी, सुरेश साहनी, संतोष घाडगे, प्रवीण वारके, गणसिंग पाटिल, मंगेश यादव, मुकेश चौधरी, राजेंद्र ठाकुर, मंगेश चंदन, निलेश पाटील विलास पाटील, संतोष गवाले, चारुलता पाटिल, जयश्री पाटील, ममता ठाकुर आदींनी परिश्रम घेतले.


