भुसावळ पालिका निवडणूक : दुसर्या दिवशी सुध्दा एक अर्ज दाखल
Bhusawal Municipal Election: One application filed on the second day as well भुसावळ (13 नोव्हेंबर 2025) : भुसावळ पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसर्या दिवशी सुध्दा फरहीन अलताफ गवळी यांनी एक उमेदवारी अर्ज दाखल केला. दोन दिवसात दोन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्याकडे दाखल झाले.
पालिका निवडणुकीसाठी उत्सुकता वाढली
शहरात पालिका निवडणूकीची धामधूम सुरू असून कुठल्या प्रभागातून कोण उमेदवार अर्ज दाखल करतात? याकडे राजकीय पक्षाच्या सह सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी एकता ठाकूर यांनी भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला तर दुसर्या दिवशी फरहीन गवळी यांनी प्रभाग 17 मधून अर्ज दाखल केला. दोन दिवसात दोन अर्ज दाखल झाले आहे. प्रांताधिकारी कार्यालयात बुधवारी शांतता होती. गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राजकीय पक्षांतर्फे कधी उमेदवारी अर्ज दाखल केले जातील ? याकडे लक्ष लागून आहे.


