भुसावळात ज्वारी, मका खरेदीसाठी नोंदणीला सुरूवात
ज्वारीला 3699, मक्याला 2400 रुपये दर
Registration begins for purchase of jowar, maize in Bhusawal भुसावळ (13 नोव्हेंबर 2025) : भुसावळ तालुका शेतकरी सहकारी संघ भुसावळ खरेदी केंद्रात खरीप हंगाम 2025/26 खरीप हंगामात ज्वारी, मका खरेदीसाठी गुरुवारपासून नोंदणीला सुरूवात झाली. सकाळी 10 ते दुपारी 4 दरम्यान शेतकर्यांना नोंदणी करता येईल.
शेतकर्यांना नाव नोंदणीसाठी पिकपेरा लावलेला ऑनलाईन सातबारा उतारा, नमुना 8 खाते उतारा, आधार कार्ड झेरॉक्स,बँक पास बुक झेरॉक्स इत्यादी स्पष्ट स्वरूपात कागदांची आवश्यकता असेल. नावनोंदणीवर प्रत्यक्ष येऊन थांबून नोंदणी करावी लागणार आहे. ज्वारीला 3699 रुपये तर मक्याला 2400 रुपये प्रतिक्विंटल हमी भाव मिळणार आहे. यामुळे अधिकाधिक शेतकर्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन चेअरमन ज्ञानदेव झोपे, व्हाईस चेअरमन प्रशांत निकम, व्यवस्थापक विजय झोपे यांनी केले आहे.


