जळगावातील चिमुकल्याचा अंगावर गरम पाणी पडल्याने मृत्यू


A toddler in Jalgaon died after being hit by hot water जळगाव (13 नोव्हेंबर 2025) : जळगाव शहरातील वाटीका आश्रम परिसरातील चार वर्षीय चिमुकल्याच्या अंगावर गरम पाणी पडल्याने गंभीर भाजला गेल्याने उपचारादरम्यान दुदैवी मृत्यू झाला. बुधवार, 12 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता घडली. याप्रकरणी सायंकाळी सहा वाजता जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. चेतन जितेंद्र पाटील (4, रा. वाटीका आश्रम, जळगाव) असे मयताचे नाव आहे.

काय घडले चिमुकल्यासोबत ?
जळगाव शहरातील वाटिका आश्रम परिसरात चेतन पाटील हा चिमुकला आपल्या आई-वडीलांसह वास्तव्याला होता. आठ दिवसांपूर्वी घरात चिमुकला हा घरात खेळत असतांना बाथरूमध्ये गेल्यानंतर बादलीत असलेले गरम पाणी अंगावर पडल्याने भाजला गेला. त्याच्यावर जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू होते व उपचारादरम्यान बुधवार, 12 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता त्याची प्राणज्योत मालविली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस उपनिरीक्षक शामकुमार मोरे हे करीत आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !