यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील सौभाग्यवतींसह ठाकरे गटात : पालिका निवडणुकीत बदलणार समीकरणे
Former Yaval Mayor Atul Patil joins Thackeray faction along with Saubhagyawati : Equations will change in municipal elections यावल (13 नोव्हेंबर 2025) : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचे खंदे समर्थक व यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी आपल्या सौभाग्यवतीसह गुरुवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केल्यानंतर राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. सौ.छाया पाटील या यावल पालिका निवडणुकीत आता ठाकरे गटाच्या उमेदवार असतील हे स्पष्ट असून यावलमध्ये अत्यंत चुरशीची लढत होणार असल्याचे निश्चित आहे.
ठाकरे गटात पाटील दाम्पत्य
यावलचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकसभा प्रमुख अतुल पाटील यांनी गेल्या अनेक दिवसांपासून जनसंपर्क मोहीम सुरू केली आहे. ते प्रत्येक मतदाराच्या भेटी घेत असून यंदाचे आरक्षण हे महिला राखीव निघाले असून या जागेवर त्यांच्या पत्नी छाया पाटील या रिंगणात उतरणार आहेत. तर स्वतः अतुल पाटील हे वार्ड क्रमांक 11 मधून नगरसेवक पदाची निवडणूक लढवणार असून गेल्या अनेक दिवसांपासून ते नेमके कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार ? हे स्पष्ट नव्हते. या पार्श्वभूमीवर त्यांनी गुरुवारी आपली भूमिका अखेर जाहीर केली आहे.
माजी नगराध्यक्ष अतुल पाटील आणि त्यांच्या पत्नी छाय पाटील या दोन्ही मान्यवरांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश केला. यामुळे आता ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून मशाल या चिन्हावर निवडणूक लढवतील हे स्पष्ट आहे. यावल शहरातील नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राहणार असून नगरसेवकांच्या जागांमध्ये घटक पक्षांना स्थान देण्यात येणार असल्याचे आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत ठरवण्यात आले.


