राष्ट्रवादीला फटका बसलेले ‘पिपाणी’ चिन्ह निवडणूक आयोगाकडून रद्दबातल


Election Commission cancels ‘Pipani’ symbol that hit NCP पुणे (14 नोव्हेंबर 2025) : राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाल्यानंतर लोकसभा व विधानसभा निवडणुकीला सामोरे गेलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह देण्यात आले मात्र अपक्ष उमेदवारांना मिळणार्‍या ‘पिपाणी’ या साधर्म्य असणार्‍या चिन्हामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याने पवारांच्या राष्ट्रवादीला दोन निवडणुकांमध्ये मोठा फटका बसला मात्र आता आता निवडणूक आयोगाने अपक्षांसाठी असलेले हे ‘पिपाणी’ चिन्ह कायमस्वरूपी रद्द केले आहे.

निवडणूक आयोगाला सुनावले खडे बोल
निवडणूक आयोगाने घेतलेल्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आनंद व्यक्त करतानाच निवडणूक आयोगाला खोचक टोला लगावला. शिंदे यांनी ट्विट करत, तुतारी चिन्हाशी साधर्म्य असलेले पिपाणी चिन्ह कायमचे वगळल्याबद्दल आयोगाचे आभार मानले आहेत. पण त्याच वेळी, झालेल्या नुकसानीचा संदर्भ देत त्यांनी निवडणूक आयोगाला खडे बोल सुद्धा सुनावले आहेत.

अनेकांचा झाला पराभव
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळालेले ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह आणि अपक्ष उमेदवारांना दिलेले ‘पिपाणी’ हे चिन्ह यांच्यातील साधर्म्यामुळे मतदारांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. या चिन्हांमधील साधर्म्यामुळे लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर मते मिळाली आणि थेट निवडणुकीच्या निकालावर त्याचा परिणाम दिसून आला. सातारा लोकसभा मतदारसंघातून शशिकांत शिंदे यांना याच पिपाणी चिन्हामुळे पराभवाला सामोरे जावे लागले, तर बीड लोकसभेतही असाच प्रकार घडला होता.

सातारा मतदारसंघात शशिकांत शिंदे यांनी उदयनराजे भोसले यांच्या विरोधात जोरदार शड्डू ठोकला होता. मात्र, पिपाणीमुळे मतविभागणी झाल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !