बिहारातील विजयानंतर उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले ; जनतेने लालूंचे जंगलराज नाकारले ; लाडक्या बहिणींचे मानले आभार


After the victory in Bihar Deputy Chief Minister Shinde said ; People rejected Lalu’s Jungle Raj; Thank you dear sisters पाटणा (14 नोव्हेंबर 2025) : बिहारातील विधानसभा निवडुणकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने विजय मिळवल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींचे आभार मानत जनतेने लालूंचे जंगलराज नाकारल्याची भावना व्यक्त केले. बिहारच्या जनतेने या जनादेशामुळे लालूंचे जंगलराज नाकारल्याचेही ते यावेळी म्हणाले.

महाविकास आघाडीचा उडाला धुव्वाँ
बिहार विधानसभा निवडणुकीत राजद व काँग्रेसच्या महाआघाडीचा पार धु्व्वा उडाला आहे तर सत्ताधारी एनडीएचा ऐतिहासिक विजय झाला आहे. यामुळे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वातील एनडीएचे सरकार सलग पाचव्यांदा येण्याचा मार्ग मोकळा झाला. एनडीएच्या या विजयात बिहारमधील महिलांना निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येकी 10 हजार रुपयांच्या करण्यात आलेल्या मदतीचा मोठा वाटा असल्याचे मानले जात आहे. विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्याची पुष्टी केली आहे. लाडक्या बहिणींमु्ळेच बिहारमध्ये भाजपला दैदिप्यमान विजय मिळाल्याचे ते म्हणालेत.




लाडक्या बहिणींमुळे एनडीएचा मोठा विजय
एकनाथ शिंदे म्हणाले, बिहारमध्ये एनडीएचा मोठा विजय झाला. तेथील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बिहारमध्ये केलेल्या विकासावर विश्वास ठेवला. त्यामुळे मी त्यांचेही मनापासून अभिनंदन करतो. एवढेच नाही तर मी लाडक्या बहिणींचेही अभिनंदन करतो. कारण, लाडक्या बहिणींनी तिथे मोठ्या प्रमाणात मतदान केले. महाराष्ट्रात लाडक्या बहिणींचे मतदान वाढल्यामुळे लँडस्लाईड व्हिक्ट्री मिळाली. तशीच लँडस्लाईड व्हिक्ट्री बिहारमध्ये लाडक्या बहिणींमुळे मिळाली. बिहारच्या जनतेने जंगलराज नाकारले आणि विकासराज स्वीकारले. त्यामुळे एनडीएला अशा प्रकारचा विजय मिळाला.

 










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !