बिहार विधानसभेत कमळ फुलताच भुसावळात भाजपेयींचा जल्लोष


BJP workers celebrate in Bhusawal as lotus blooms in Bihar Assembly भुसावळ (14 नोव्हेंबर 2025) : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप-प्रणित एनडीए आघाडीला मिळालेल्या दणदणीत विजयानंतर भुसावळ शहरातील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी फटाक्यांची आतषबाजी करीत मिठाई वाटून आनंद व्यक्त केला.

मंत्री संजय सावकारे यांची उपस्थिती
सुरभी नगरातील मंत्री संजय सावकारे यांच्या कार्यालयाबाहेर शुक्रवारी सायंकाळी बिहारातील निवडणूक निकालाचे चित्र स्पष्ट होताच मंत्री संजय सावकारे यांच्या उपस्थितीत भाजपा पदाधिकार्‍यांनी जल्लोष केला. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष, माजी नगरसेवक तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.





निकालानंतर कार्यकर्त्यांना मिळाली नवी उर्जा ; मंत्री सावकारे
बिहारमधील भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांना मिळालेले स्पष्ट बहुमत हे तेथील मतदारांनी सुशासन, विकास आणि स्थिरतेवर टाकलेला विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या या विजयामुळे देशभरातील कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा आणि प्रेरणा संचारली असल्याचे मंत्री संजय सावकारे यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !