डोंगराळे अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी द्या : भुसावळात रजनी सावकारे
Hang the accused in the Dongrale atrocity case : Rajani Savkare in Bhusawal भुसावळ (17 नोव्हेंबर 2025) : चॉकलेट देण्याच्या बहाण्याने साडेतीन वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करीत तिच्यावर अत्याचार केल्यानंतर तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात घडला होता. या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली असून या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी माहिती भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी बुधवार, 19 रोजी करीत या घटनेचा निषेध व्यक्त केला.
काय आहे नेमके प्रकरण
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील चिमुकल्याच्या पालकांचे आरोपीशी महिना भरापूर्वी भांडण झाले व त्या रागातून आरोपीने अल्पवयीन बालिकेला चॉकलेटच्या आमिषाने बाहेर नेत अत्याचारानंतर तिची हत्या केली. गावाजवळील मोबाईल टॉवरजवळ बालिकेचा मृतदेह आढळल्यानंतर आरोपीवर संशयाची सुई गेल्यानंतर त्यास अटक करण्यात आली.

आरोपीला द्यावी फाशीची शिक्षा
डोंगराळे घटनेतील आरोपीला शारीरीक यातना होतील अशा पद्धत्तीने फाशीची शिक्षा द्यावी, सरकारने अशा अप्रिय घटना टाळण्यासाठी कठोर कायदे करावेत व डोंगराळे प्रकरणातील खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावा, अशी मागणी भुसावळातील प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी संजय सावकारे यांनी केली. शहरातील मंत्री संजय सावकारे यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर यावेळी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या पदाधिकार्यांच्या उपस्थितीत या घटनेचा निषेध करण्यात आला.


