भुसावळातील प्रभाग नऊ ‘ब’ च्या सर्वांगीण विकासासाठी आपली उमेदवारी
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार ममता डागोर यांची माहिती
भुसावळ (19 नोव्हेंबर 2025) : भुसावळ (19 नोव्हेंबर 2025) : भुसावळ पालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 9 ब मधून सौ.ममता अजय डागोर यांनी नुकताच अजित पवार गटाकडून उमेदवारी अर्ज सादर केला आहे. उमेदवारी अर्जानंतर त्यांच्यासह त्यांचे पती अजयकुमार डागोर यांनी प्रभागात संपर्क वाढवला आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपली उमेदवारी असल्याचे यावेळी बोलताना ममता डागोर यांनी सांगितले.
प्रभागाच्या विकास सर्वांगीण विकासासाठी आपली उमेदवारी
यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार सौ.ममता डागोर यांनी सांगितले की, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्वेसर्वा अजितदादा पवार, जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे व सर्व वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला उमेदवारी दिल्याने त्यांचे आपण मनापासून आभारी आहोत. शहरातील प्रभाग क्रमांक नऊ आपल्यासाठी नवीन नसून याच भागात आपला रहिवास असल्याने या भागातील मतदारांशी आपली नाळ जुळली आहे शिवाय त्यांच्या अडी-अडचणी समस्या आपण जाणून असल्यानेच या भागातून आपण उमेदवारी करीत आहोत. जनता जनार्दनाने निवडून दिल्यानंतर निश्चितपणे या भागातील समस्या सोडवू, असा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पत्नीच्या विजयासाठी पतीने कसली कंबर
सौ.ममता डागोर यांच्या विजयासाठी त्यांचे पती अजयकुमार डागोर यांनी कंबर कसली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन केल्यानंतर आता डागोर परिवाराने प्रभागातील मतदारांच्या गाठी-भेटी घेत प्रचारात आघाडी घेतली असून मतदारांचे आशीर्वादही त्यांना लाभत आहेत.


