भाजपाची सोशल मिडीयावर बदनामी : भुसावळच्या भोंगा पेजच्या अ‍ॅडमिनविरोधात गुन्हा


BJP defamation on social media: Case filed against admin of Bhoga page in Bhusawal भुसावळ (20 नोव्हेंबर 2025) : भुसावळचा भोंगा’या नावाच्या फेसबुक पेजवरून भारतीय जनता पक्षाची बदनामी करणारी पोस्ट करण्यात आल्यानंतर भाजपाचे शहराध्यक्ष संदीप सुरवाडे यांनी भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल केला.

एबी फार्म विकल्याची पोस्ट व्हायरल
सुरवाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पेजवर 20 लाखात एबी फॉर्म विकले तसेच भाजपने बिनविरोध सीट काढली, भुसावळच्या राजकारणात उघड उघड सौदा असे खोटे व दिशाभूल करणारे आरोप करण्यात आले. यामध्ये भाजपचे नाव व कमळ चिन्ह वापरून पक्षाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांनी नमूद केले. तक्रारीनंतर शहर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध नोंद घेऊन तपास सुरू केला आहे.

या प्रकरणी ‘भुसावळचा भोंगा’पेजच्या प्रमुखांचीही चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. संबंधित पेज व पोस्टचा तांत्रिक मागोवा घेऊन पोस्ट करणार्‍याची ओळख पटवण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. या पोस्टने राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष लागले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !