भुसावळ तहसील कार्यालयाच्या संरक्षण भिंतीला रंगरंगोटीचे काम


Painting work on the protective wall of Bhusawal Tehsil Office भुसावळ (20 नोव्हेंबर 2025) : भुसावळ तहसील कार्यालयाच्या संरक्षण भिंतीस रंगरंगोटी करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. महसूल विभागातर्फे तहसील कार्यालयाच्या परिसरात सुध्दा स्वच्छता करण्यात आली आहे.

बाहेरील बाजूने संरक्षण भिंतीला रंग दिला जात आहे. याच आवारात दुय्यम निबंधक कार्यालय लवकरच सुरू होणार असल्याने तहसील कार्यालयाचा परिसर स्वच्छ करण्याचे काम सुरू केले आहे. येथे वाहनांची पार्कीग सुध्दा सुरू केली जात आहे. यामुळे तहसील कार्यालयाच्या आवारात कुठेही उभ्या राहात असलेली वाहने आता शिस्तीत राहणार आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !