भुसावळात ईव्हीएमवरील मास्टर ट्रेनरना दिले प्रशिक्षण


भुसावळ (20 नोव्हेंबर 2025) : भुसावळ पालिका सार्वत्रिक निवडणूक पारदर्शक आणि सुरळीत व्हावी यासाठी बुधवारी प्रांताधिकारी कार्यालयातील तापी सभागृहात मास्टर ट्रेनर प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत यासह निवडणूक प्रक्रियेत वापरल्या जाणार्‍या सर्व साहित्याची तांत्रिक माहिती देत प्रत्यक्ष मॉकपोलही घेण्यात आले.

निवडणुकीविषयी मार्गदर्शन
मास्टर ट्रेनरना मतदान यंत्रांची रचना, वापर पद्धत, बिघाडावर उपाययोजना, सीलिंग प्रक्रिया, मॉकपोलची पावले आणि मतदान केंद्रावर आवश्यक असलेल्या सर्व साहित्याचे मार्गदर्शन करण्यात आले. निवडणूक दिवसाचे नियोजन आणि कर्तव्य पार पाडताना घ्यावयाची दक्षता यावर अधिकारींनी विशेष भर दिला.

यांची होती उपस्थिती
या प्रशिक्षण वर्गाला निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील, सहायक निवडणूक अधिकारी राजेंद्र फातले आणि नायब तहसीलदार संतोष विनंते उपस्थित होते. अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनामुळे ट्रेनरना प्रत्यक्ष मतदान केंद्रासाठीची तयारी अधिक सक्षमपणे करता आली. भुसावळमध्ये शांततापूर्ण आणि शंभर टक्के मतदानाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी या प्रशिक्षणाचा उपयोग होणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

आज नाहाटा महाविद्यालयात प्रशिक्षण
गुरुवार, 20 रोजी सकाळी नऊ वाजता शहरातील नाहाटा महाविद्यालयात ईव्हीएमचे प्रशिक्षण कर्मचार्‍यांसाठी आयोजित करण्यात आले आहे. यात उपस्थित कर्मचार्‍यांना सूचना करण्यासोबतच ईव्हीएम मशीनचे प्रात्यक्षिक केले जाणार आहे. मतदान केंद्रावर असलेल्या कर्मचार्‍यांना स्वत: ईव्हीएम मशीनचे प्रात्यक्षिक करावे लागणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी दिली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !