यावल पालिका निवडणूक : सहा उमेदवारांची माघार, आज माघारीनंतर स्पष्ट होणार चित्र


Yaval Municipality Election: Six candidates withdraw, picture will be clear after withdrawal today यावल (21 नोव्हेंबर 2025) : यावल नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नामनिर्देशन पत्र माघार घेण्याच्या दुसर्‍या दिवशी 6 उमेदवारांनी माघार घेतली. यात काही उमेदवारांचे दोन अर्ज होते. आता नगरसेवक पदाच्या 89 उमेदवारांचे 95 अर्ज शिल्लक आहे. दरम्यान, आता शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारीची शेवटची मुदत आहे. या मुदतीत अर्ज माघारी झाल्यानंतर निवडणुकीच्या लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. दोन दिवसात सात अर्ज मागे घेण्यात आले आहे.

आज चित्र होणार स्पष्ट
यावल नगरपरिषद निवडणुकीकरिता दाखल नामनिर्देशनपत्रांची माघरीची मुदत शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. दोन दिवसात येथे सात उमेदवारांनी माघार घेतली. बुधवार एक तर गुरुवारी सहा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले. यात एकूण 91 नगरसेवकपदाच्या उमेदवारांचे 102 अर्ज दाखल होते. त्यापैकी एकच अर्ज असलेल्या दोन उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. इतर पाच उमेदवारांनी राजकीय पक्षाकडील उमेदवारी कायम ठेवत त्यांचे अपक्ष असलेले अर्ज मागे घेतले आहे. आता नगराध्यक्ष पदाकरीता 6 अर्ज तर नगरसेवक पदा करीता 89 उमेदवारांचे 95 अर्ज शिल्लक आहे. माघारीकरीता शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2025 दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत आहे. मुदतीत माघारीकरीता नगर परिषद कार्यालयात अर्ज स्विकारले जातील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अतुल गांगुर्डे यांनी दिली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !