दुचाकी अपघाताचा खोटा गुन्हा : यावलच्या तरुणाविरोधात गुन्हा
False case of bike accident: Case filed against Yaval youth यावल (21 नोव्हेंबर 2025) : यावल तालुक्यातील भालशिव येथील एका 23 वर्षीय तरुणाचा अपघात घडला मात्र या तरुणाने यावल पोलीस ठाण्यात आपल्याला एका दुचाकीने मागून धडक दिल्याची फिर्याद दाखल केली. गुन्ह्याचा तपास करतांना सदर तरुणाने विमा पॉलिसीचा लाभ मिळवण्यासाठी पोलिसात खोटी फिर्याद दिल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तक्रारदाराला पोलिसांनी आरोपी करीत गुरुवारी यावल न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. विमा पॉलिसीची रक्कम मिळवण्यासाठी तरुणाने केलेली उचापत त्याच्याच अंगलट आली.
काय घडले तरुणासोबत ?
भालशिव, ता.यावल या गावातील रहिवासी कृष्णा शंकर कोळी (23) या तरुणाचा 13 सप्टेंबर रोजी रात्री भालशिव रोडवरील पाटचारी जवळ दुचाकी (क्रमांक एम. एच. 19 डी.एम. 9479) द्वारे जात असतांना अपघात घडला होता. त्यांच्यासोबत त्यावेळेस चुडामण मन्साराम कोळी हे देखील होते व तरुण गंभीर जखमी झाला. अपघातात जखमी तरुणाने यावल पोलि ठाण्यात फिर्याद दिली होती की, त्याला त्याच्याच मित्राच्या होंडा शाईन कंपनीची मोटरसायकल (क्रमांक एम.एच. 19 ई.एन. 3142) ने मागून धडक दिल्यामुळे तो जखमी झाला होता. सदर खोटी फिर्याद होंडा शाईन मोटरसायकलचे इन्शुरन्स कागदपत्र अद्यावत असल्यामुळे त्यांनी दिली होती व त्याने विमा कंपनीकडून आर्थिक लाभापोटी खोटी व बनावट फिर्याद पोलिसात दिली. त

तक्रारदाराविरोधातच दाखल झाला गुन्हा
यावल पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे, हवालदार अमित तडवी यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करत असतांना हा प्रकार उघडकीस आणला. या गुन्ह्यातील फिर्यादी कृष्णा शंकर कोळी यालाच त्यांनी आरोपी ठरवले आहे च त्याच्याविरुद्ध यावल न्यायालयात दोषारोप पत्र पाठवले. च विमा पॉलिसीचे पैसे मिळवण्यासाठी या तरुणाने केलेली उचापत त्यांलाचं अंगलट आली आहे व आता तो आरोपीच्या पिंजर्यात अडकला आहे.
गुन्ह्याचा सखोल तपास
या गुन्ह्याचा सखोल तपास करताना व ज्या पद्धतीने अपघात दर्शवण्यात आला होता. घटनास्थळ पाहणी, वाहनाची तपासणी अंति हा बनावट अपघात दाखल केल्याचे निदर्शनास आले. हा बनावट अपघात का दाखल केला याच्या तपासणीत विमा रक्कमेचा लाभ मिळवण्यासाठी हा संपूर्ण प्रकार घडल्याचे समोर आल्यामुळे खोटी फिर्याद देणारे फिर्यादी यांच्याविरुद्धच आम्ही दोषारोप पत्र दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी दिली.


