प्रभाग क्रमांक ‘नऊ ब’ चा सर्वांगीण विकास हाच ध्यास : राष्ट्रवादीच्या उमेदवार ममता डागोर यांची ग्वाही
भुसावळ (19 नोव्हेंबर 2025) : भुसावळात होत असलेल्या पालिका निवडणुकीत सर्वच प्रभागात चुरस वाढली आहे. इच्छूक उमेदवारांनी मतदारांच्या गाठी-भेटीवर भर दिला आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 9 ब मधून राष्ट्रवादी अजित पवार गटाने उमेदवारी दिलेल्या ममता अजय डागोर यांनी प्रभागातील मतदारांशी संपर्क वाढवला आहे. त्यांच्यासह पती अजय डागोर व कार्यकर्ते प्रभागातील मतदारांच्या गाठीभेटी घेत असून त्यांचे आशीर्वाद घेत समस्याही जाणून घेत आहेत.
प्रभागाचा विकास हाच ध्यास
प्रभागाच्या विकासासाठी आपली उमेदवारी असून जनतेने आशीर्वाद दिल्यास निश्चितपणे आपण प्रभागाचा विकास करू, असे उमेदवार ममता डागोर यांनी यावेळी सांगितले. राष्ट्रवादी अजित पवार गटातील सर्व पक्ष श्रेष्ठींचे आपण आभारी असून दिलेली उमेदवारी आपण सार्थ ठरवू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.




