भुसावळ पालिका निवडणुकीत भाजपाचे पिंटू कोठारी व महिमा अजय नागराणी बिनविरोध

भाजपा समर्थकांचा जल्लोष : पालिका निवडणुकीत भाजपाच्या तीन जागा बिनविरोध


BJP’s Pintu Kothari and Ajay Nagrani are unopposed in Bhusawal Municipal Elections भुसावळ (21 नोव्हेंबर 2025) : भुसावळ पालिका निवडणुकीत रंगत वाढली असून माघारीच्या अखेरच्या दिवशी शुक्रवार, 21 रोजी भाजपाच्या दोन उमेदवारांविरोधात उभ्या असलेल्या उमेदवारांनी माघार घेतल्याने भाजपाच्या दोन जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. प्रभाग क्रमांक 21 ब मधून साईसेवक पिंटू उर्फ निर्मल कोठारी तसेच प्रभाग 23 अ मधून महिमा अजय नागराणी बिनविरोध निवडून आल्या आहेत.

काय घडले पालिका निवडणुकीत ?
भुसावळातील साईसेवक पिंटू कोठारी प्रभाग क्रमांक 21 ब मधून भाजपाचे उमेदवार होते मात्र प्रतिस्पर्धी उमेदवार महाविकास आघाडीचे उमेदवार आऊँ चौधरी यांनी अखेरच्या दिवशी शुक्रवारी माघारी घेतल्याने व या प्रभागातून केवळ दोनच उमेदवार शिल्लक राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.



भुसावळातील क्रमांक 23 अ मधून महिमा अजय नागराणी या भाजपातर्फे उमेदवार होत्या तर त्यांच्याविरोधात पुष्पा कैलास चौधरी उभ्या होत्या. माघारीच्या दिवशी त्यांनी माघार घेतल्याने महिमा अजय नागराणी यांचीही बिनविरोध निवड झाली.

भाजपाने तीन जागांवर मिळवला विजय
माघारीच्या दिवशी दोन उमेदवारांनी अचानक घेतलेल्या माघारीनंतर भाजपाच्या दोन जागा बिनविरोध झाल्या तर प्रभाग सात अ मधील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार सारीका युवराज पाटील यांच्या अर्जासोबत जोडलेला एबी फार्म हा त्यांचे पती युवराज पुंडलिक पाटील यांच्या नावाचा पक्षाने दिल्यानंतर त्या अपात्र ठरल्याने येथे भाजपाच्या प्रीती मुकेश पाटील या बिनविरोध निवडून आल्या. आतापर्यंत भाजपाने तीन जागांवर मुसंडी मारल्याने भाजपेयींमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे दोन जागांवर महिलांनी यश मिळवले आहे.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !