जळगावात सुवर्ण कारागीराचे घर फोडत 16 लाखांचे दागिने लांबवले


Goldsmith’s house broken into in Jalgaon, jewellery worth Rs 16 lakh stolen जळगाव (21 नोव्हेंबर 2025) : सुवर्ण कारागीराचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 15 लाख 70 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लांबवली. जळगाव शहरातील गीताई नगर परिसरात ही घटना घडल्याने खळबळ उडाली.

बंद घर चोरट्यांना पर्वणी
बुधवार, 19 नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता गीताई नगरातील मालचंद गौरीशंकर सोनी हे आपल्या कुटुंबीयांसह बाहेर गेले असल्याने त्यांचे घर बंद होते. चोरट्यांनी घराबाहेरील सेफ्टी डोअर आणि आतील लाकडी दरवाज्याचे कडी-कोयंडा कापून घरात प्रवेश केला.



सुमारे 15 लाख 20 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे तसेच 50 हजारांची रोकड चोरट्यांनी लांबवली.

घरफोडीची माहिती मिळताच मालचंद सोनी यांचे पुतणे नरेंद्र सोनी यांनी शनिपेठ पोलिसात तक्रार दाखल केली. तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश ढिकले करीत आहेत.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !