एमआयडीसी पोलिसांची मोठी कामगिरी : 61 सिलिंडर चोरणार्या जळगावसह नशिराबादच्या चोरट्याला बेड्या
MIDC police’s big achievement: Thief from Jalgaon and Nashirabad who stole 61 cylinders arrested जळगाव (21 नोव्हेंबर 2025) : जळगाव एमआयडीसी पोलिसांनी ट्रकमधून 61 सिलिंडर चोरणार्या जळगावसह नशिराबादच्या चोरट्याला अटक केली. आरोपींच्या ताब्यातून पाच लाख रुपये किंमतीचे आयशर वाहन जप्त करण्यात आले आहे.
काय घडले जळगावात ?
जळगावातील भारत पेट्रोलियम येथून रिफिलिंग केलेले 342 नग सिलेंडर एका ट्रकमध्ये असताना 61 नग सिलेंडरची चोरी झाल्याचे 14 रोजी उघड होताच एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. एमआयडीसी पोलिसांनी गोपनीय बातमीदारांकडून माहिती काढत 18 नोव्हेंबर रोजी रचून शेख फिरोज शेख याकुब (रा.नशिराबाद) या आरोपीस ताब्यात घेतले व त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदार सैय्यद मुश्ताक सैय्यद अशपाक (रा. उस्मानिया पार्क, जळगाव) याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिल्यानंतर त्यासही अटक करण्यात आली.


दोन्ही आरोपींकडून चोरी केलेले एक लाख 22 हजार रुपये किंमतीचे 61 नग गॅस सिलेंडर तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले सुमारे पाच लाख रुपये किमतीचे आयशर वाहन जप्त करण्यात आले. एमआयडीसी पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलिस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.


