भुसावळातील सिंधी कॉलनीत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची आज जाहीर सभा
भुसावळ (25 नोव्हेंबर 2025) : भुसावळ शहरातील प्रभाग क्रमांक 23 चे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रकाश रमेशलाल बतरा (निक्की भाऊ) यांच्यासह नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रजनी संजय सावकारे यांच्या प्रचारार्थ मंगळवार, 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांची प्रचार सभा होत आहे.
शहरातील सिंधी कॉलनीतील छोटा सेवा मंडळ, नानक मेडिकलजवळ होणार्या जाहीर सभेत प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती द्यावी, असे आवाहन उमेदवार निकी बतरा यांनी केले आहे.





