भुसावळात भाजपा उमेदवार रजनी सावकारे यांच्या प्रभाग 22 व 25 मधील प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
भुसावळ (25 नोव्हेंबर 2025) : भुसावळातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाइं, लहुजी शक्ती सेना महायुतीतील भुसावळ नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रजनी संजय सावकारे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 22 व 23 भाजपातर्फे प्रचार रॅली काढण्यात आली. याप्रसंगी रॅलीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले.
नागरिकांच्या घरोघरी जावून घेतल्या भेटी
मंगळवार, 25 रोजी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाइं, लहुजी शक्ती सेना महायुतीच्यावतीने भुसावळ नगरपरिषदेतील लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रजनी सावकारे यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक 22 आणि 25 मध्ये प्रचार रॅली काढण्यात आली. माजी नगरसेवक पिंटू ठाकूर, माधुरी फालक यांच्या नेतृत्वाखाली घरोघरी जावून मतदारांच्या भेटी घेण्यात आल्या.



ठिकाणी रॅलीचे स्वागत
प्रचार दौर्यादरम्यान नागरिकांनी रॅलीचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. अनेक ठिकाणी महिलांनी आणि ज्येष्ठ नागरिकांनी पक्ष पदाधिकार्यांशी संवाद साधत स्थानिक प्रश्न मांडले. त्याचबरोबर, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेतील विकासाभिमुख दृष्टीकोन, पारदर्शक प्रशासन आणि भुसावळच्या सर्वांगीण प्रगतीसाठी रजनी सावकारे यांच्या नेतृत्वाची गरज अधोरेखित केली.
या प्रचार मोहिमेत भारतीय जनता पार्टी महायुतीचे सर्व पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, आघाडी-मोर्चा पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


