भुसावळ पालिका निवडणूक : तिघा उमेदवारांचे अपिल फेटाळले

निवडणूक अधिकार्‍यांचा निर्णय कायम ; वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध


भुसावळ (26 नोव्हेंबर 2025) : भुसावळ पालिका निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध तीन उमेदवारांनी न्यायालयात धाव घेतली मात्र मंगळवारी न्यायालयाने निवडणूक अधिकार्‍यांचा निर्णय कायम ठेवत अपिल फेटाळले. यानंतर प्रशासनाने वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे.

तीन उमेदवारांचे न्यायालयात अपिल
पालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज छाननीत उमेदवारांनी एकमेकांच्या अर्जावर हरकती घेतल्या होत्या. त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी निकाल दिला मात्र या निकालाविरूद्ध मेघा वाणी, वर्षा तावडे, परीक्षीत बहाटे या उमेदवारांनी न्यायालयात अपिल दाखल केले व न्यायालयाने अपीलकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेत मंगळवारी निवडणूक अधिकार्‍यांचा निर्णय कायम ठेवला.




  • या उमेदवारांबाबत अपिल
    मेघा वाणी यांनी भावना पाटील यांचा अर्ज अपूर्ण असल्याची हरकत घेतली होती पण अर्ज परिपूर्ण असल्याचे सांगत निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी वाणींची हरकत निकाली काढली होती. त्याविरुद्ध वाणी न्यायालयात गेल्या होत्या.
  • उमेदवार वर्षा तायडे यांच्या अर्जासोबत खर्चविषयक हमीपत्र जोडले नसल्याने त्यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी अवैध ठरवल्याने तायडे न्यायालयात गेल्या होत्या. न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकार्‍यांचा निर्णय कायम ठेवला.
  • उमेदवार परीक्षीत बर्‍हाटे यांनी अशोक चौधरी यांचा अपक्ष म्हणून असलेला अर्ज पात्रता पूर्ण करत नाही. तो अवैध घोषित करावा अशी मागणी केली होती. पण निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी त्यांचे म्हणणे अमान्य केले. हाच निर्णय न्यायालयाने कायम ठेवला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !