डोंगराळे घटनेतील नराधमाला फाशी द्या : भुसावळातील सुवर्णकार समाजाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
भुसावळ (26 नोव्हेंबर 2025) : मालेगाव तालुक्यातील डोंगराळेतील तीन वर्षीय अल्पवयीन बालिकेची अत्याचारानंतर हत्या करण्यात आली होती. या घटनेतील नराधमाला फाशी देण्यासह घटनेचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी भुसावळ दौर्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली.
अत्याचारानंतर बालिकेची हत्या
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे एका तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून नंतर दगडानं ठेचून तिला संपवण्यात आले. या प्रकरणी आरोपी विजय खैरनार (24) यास अटक करण्यात आली आहे. आरोपीला भर चौकात फाशी द्यावी, अशी मागणी राज्यातून होत असून या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.



भुसावळात मुख्यमंत्र्यांना निवेदन
डोंगराळे घटनेतील नराधमाला फाशी द्यावी तसेच खटला जलदगती न्यायालयात चालवून पीडीत कुटूंबाला न्याय द्यावा, अशी मागणी भुसावळ दौर्यावर आलेल्या गृहमंत्री व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आशापुरी सोनार महिला मंडळ आणि श्री संत नरहरी सेवा समिती, नव अहिर सुवर्णकार मंडळ, भुसावळतर्फे करण्यात आली. यावेळी समाजातील महिला व पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित होते.


