भुसावळचा चौफेर विकास करणार ! : प्रभाग 13 मध्ये आयोजित रॅलीत भाजपा उमेदवार रजनी सावकारे


भुसावळ (26 नोव्हेंबर 2025) : भुसावळ शहरातील प्रलंबित प्रश्नांचा निपटारा करण्यासह सर्वसमावेशक विकासाला गती देणार असल्याची ग्वाही भाजपा युतीच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. रजनी संजय सावकारे यांनी दिली. बुधवार, 26 रोजी प्रभाग क्रमांक 13 मध्ये त्यांच्या प्रचारार्थ मोठी रॅली काढण्यात आली. यावेळी मतदारांशी संवाद साधताना त्यांनी विकासाचे व्हिजन सांगितले. कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी झाले.

यांचा प्रचार रॅलीत सहभाग
प्रचारादरम्यान भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाइं, लहुजी शक्ती सेना महायुतीचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक, विविध मोर्चे-आघाड्यांचे पदाधिकारी, भाजपा शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, किरण कोलते, सरचिटणीस पवन बुंदेले, अमोल महाजन, जयंतराव माहुरकर, सागर चौधरी यांनी या दौर्‍याचे नेतृत्व केले.




शहराचा चौफेर विकास करणार
प्रभाग 13 मधील रेणुका माता मंदिर परिसरातून रॅलीला सुरूवात झाली. गुर्जर कॉलनी, रिंग रोड, शिवदत्त नगर या भागांत प्रत्येकी ठिकाणी नागरिकांशी भेट घेऊन महायुती सरकारची कामगिरी आणि स्थानिक विकासासाठी आखलेल्या योजना याबाबत माहिती देण्यात आली. रजनी सावकारे यांनी यावेळी मतदारांनी संधी दिल्यास शहराचा चौफेर विकास करण्याची ग्वाही दिली.

मूलभूत समस्या सोडवण्यास प्राधान्य
नागरिकांशी संवादादरम्यान पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, सुरक्षाविषयक सुविधा, महिला-सुरक्षा यांसारखे स्थानिक प्रश्नांवर चर्चा केल्यानंतर निश्चितपणे या समस्या सुटतील, असा आशावाद भाजपा पदाधिकार्‍यांसह उमेदवार सावकारे यांनी व्यक्त केला.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !