प्रभागाचा विकास हाच ध्यास : भुसावळातील प्रभाग क्रमांक 9 मधील राष्ट्रवादीच्या उमेदवार ममता डागोर

आज सायंकाळी प्रचार रॅली : प्रचाराचे कार्यकर्त्यांकडून सुक्ष्म नियोजन


भुसावळ (26 नोव्हेंबर 2025) : प्रभाग क्रमांक 9 चा सर्वांगीण विकास हाच ध्यास घेवून आपण निवडणूक रिंगणात असून मतदारांनी संधी दिल्यास या प्रभागाचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास प्रभाग 9 ब मधील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार ममता अजय डागोर यांनी सांगितले. उमेदवाराच्या प्रचारार्थ दररोज सकाळी व सायंकाळी प्रचार रॅली काढण्यात येत असून थेट मतदारांशी संवाद साधला जात आहे. दरम्यान, बुधवार, 26 रोजी सायंकाळी पाच वाजता उमेदवाराच्या प्रचारार्थ प्रचार रॅली निघणार आहे.

डोअर टू डोअर प्रचार
प्रभाग क्रमांक 9 ब मधील राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार ममता डागोर यांच्या प्रचारार्थ त्यांचे पती व समाजसेवक अजय कुमार डागोर यांनी प्रचाराचे अत्यंत सुक्ष्म नियोजन केले आहे शिवाय कार्यकर्त्यांनीदेखील प्रचाराची धूरा आपल्या हातात घेत जोरदार प्रचार सुरू केला आहे. सकाळी व सायंकाळी दोन टप्प्यात उमेदवार समर्थक प्रत्येक मतदारांच्या दारी जावून त्यांना विकासाचे व्हिजन सांगत त्यांच्या समस्याही ऐकून घेत आहेत.




विजय आपलाच होणार : ममता डागोर
नगरपालिका निवडणुकीत जनतेचा आशीर्वाद निश्चितपणे आपल्या सोबत असून निवडून आल्यानंतर नागरिकांच्या समस्या सोडवण्यास आपले प्रथम प्राधान्य असेल, अशी ग्वाही भुसावळातील प्रभाग क्रमांक 9 ब मधून राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे रिंगणात असलेल्या ममता अजय डागोर यांनी दिली. प्रभागातील नागरिकांशी आपण कनेक्ट असून जनमताचा कौल आपल्यालाच मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी ‘ब्रेकींग महाराष्ट्र’ शी बोलताना व्यक्त केला.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !