वरणगावात पाणीपुरवठा योजनेचे काम करताना सुनील काळेंकडून ‘आर्थिक त्रास’ : ठेकेदार सचिन जैन यांचा आरोप


वरणगाव (1 डिसेंबर 2025) : वरणगावात पाणीपुरवठा योजनेचे काम करताना माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्याकडून आंदोलनाच्या माध्यमातून दडपशाही करून आर्थिक पैशांची मागणी करण्यात आल्याचा आरोप मुक्ताईनगरचे ठेकेदार सचिन जैन यांनी केला आहे.

काय म्हणाले ठेकेदार ?
ठेकेदार जैन यांनी भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, योजनेचे काम करीत निकृष्ट रेतीचा आरोप करून काम बंद पडले जायचे व नंतर पैशांची मागणी केली जायची. या योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा दावा त्यांनी केला. तत्कालीन मुख्याधिकारी समीर शेख व प्रशासक रामसिंग सुलाणे यांनी अरिहंत कन्स्ट्रक्शनने दिलेली बँक गॅरंटी बोगस असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी संबंधितांना खुलासा करण्यासाठी संपर्क केला मात्र त्यानंतरही ठोस कारवाई झाली नाही. अधिकारी व माजी नगराध्यक्षांच्या संगनमताने हा सर्व प्रकार घडला. वास्तविक कंत्राटदाराला ब्लॅक लिस्ट करणे गरजेचे होते मात्र तसे घडले नाही. आपल्या कंपनीने दोन वर्ष काम केल्याचे जैन म्हणाले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !