भुसावळात पोस्टल मतदान 97 टक्के
भुसावळ (2 डिसेंबर 2025) : भुसावळ पालिका निवडणुकीसाठी निवडणूक विभागाकडून 29 , 30 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर असे तीन दिवस पोस्टल मतदानाची सुविधा देण्यात आली. या सुविधेसाठी 594 कर्मचारी-मतदारांनी अर्ज दाखल केले होते. शनिवार, 29 नोव्हेंबर रोजी 305 कर्मचारी मतदारांनी मतदान केले, तर रविवार, 30 नोव्हेंबर रोजी 219 जणांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. सोमवारी 33 जणांनी मतदान केले तर 24 मतदार मतदानापासून दूर राहिले. तीन दिवसात 97 टक्के मतदान झाले.
93 टक्के मतदान
पालिका निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर निवडणुकीच्या प्रक्रियेत सामील झालेल्या कर्मचार्यांना त्यांचे मतदान वाया जाऊ नये, त्यांनाही मतदानाचा हक्क बजाविता यावा यासाठी पोस्टल मतदान प्रक्रीया राबविण्यात आली. शनिवार व रविवार (दि.29 व 30 नोव्हेंबर व 1 डिसेंबर) असे तीन दिवस ही प्रक्रिया राबविण्यात आली. या काळात 570 मतदारांनी मतदान केले. उर्वरीत 24 जण हे मतदानापासून दूर राहीले. सोमवारी तहसील कार्यालयात पोस्टल मतदान घेण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी जितेद्र पाटील, नायब तहसीलदार संतोष विनंते यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टल मतदानाची प्रक्रीया पार पडली. शनिवार व रविवारी पोस्टल मतदान करण्यासाठी निवडणूक यंत्रणेत असलेल्या कर्मचार्यांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली.


