जळगाव जिल्ह्यात पहिल्या चार तासात 16.60 टक्के मतदान


16.60 percent voting in the first four hours in Jalgaon district जळगाव (2 डिसेंबर 2025) : जळगाव जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकीला मंगळवारी उत्साहपूर्ण वातावरणात सुरूवात झाली. सुरूवातीच्या चार तासात जिल्ह्यात 16.60 टक्के मतदान झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरळीत प्रारंभ झाला. मंगळवारी सकाळी 11.30 वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण 16.60 टक्के मतदान नोंदवण्यात आले आहे. यावर्षीच्या मतदानात ग्रामीण व शहरी भागातील मतदार दोन्ही ठिकाणी उत्साहाने सहभागी होत असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. मतदानाच्या सुरुवातीपासूनच अनेक केंद्रांवर मतदारांची लक्षणीय गर्दी दिसून आली

यावलला सर्वाधिक मतदान
जळगाव जिल्ह्यातील यावल नगरपरिषद मतदानात सर्वाधिक आघाडीवर आहे. येथे 25.45 टक्के मतदान झाले असून भडगाव येथे फक्त 8.98 टक्के मतदान नोंदवले गेले असून ते सर्वात कमी मतदान असलेले ठिकाण ठरले आहे. अनेक भागांमध्ये मतदारांची उपस्थिती हळूहळू वाढताना दिसत आहे

निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार विविध नगरपरिषद व नगरपंचायतींची मतदान टक्केवारी पुढीलप्रमाणे
जामनेर 15.58, भुसावळ 16.57, यावल 25.45, फैजपूर 24.20, पाचोरा 11.68, वरणगाव 19.47, अमळनेर 15.79, चाळीसगाव 17.03, सावदा 13.01, चोपडा 14.09, भडगाव 8.98, रावेर 20.2, धरणगाव 18.77, एरंडोल 21.82, पारोळा 16.76, नशिराबाद 15.05, मुक्ताईनगर 14.97, शेंदुर्णी 18.91, तर एकूण मतदान 16.60 टक्के एवढे झाले आहे

जिल्हाभर शांततेत मतदान सुरू असून कोणतीही मोठी अनुचित घटना घडलेली नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दुपारनंतर मतदानाच्या प्रमाणात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त आहे.

भुसावळात असे झाले मतदान
वळ सकाळी 7.30 ते 9.30
स्त्री मतदार- 3913
पुरुष मतदार- 5249
तृतीयपंथी मतदार-0
एकूण झालेले मतदान- 9162
एकूण मतदान टक्केवारी- 5.12%

वेळ सकाळी 7.30 ते 11.30
स्त्री मतदार- 16043
पुरुष मतदार- 13576
तृतीयपंथी मतदार- 1
एकूण झालेले मतदान- 29620
एकूण मतदान टक्केवारी- 16.57%





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !